Uncategorized

महावितरण च्या हलगर्जीपणामुळे कुपटी येथे चालू लाईनचे चार वायर तुटून पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला,.

माहूर : तालुक्यातील मौजे कुपटी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला लागून असलेली तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला लागून असलेल्या डीपी वरची चालू लाईनीमध्ये डीपी मधून जाणारी चार तारीख तुटून पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला सुदेवाने त्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी व गावातील कोणतीही व्यक्ती नसल्यामुळे मोठी जीवित हानी टळली वायर तुटून पडलेले कळताच गावचे युवा सरपंच प्रफुल भुसारे यांनी येऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोनवर सांगितले व त्वरित लाईट बंद करण्यात आले, नाहीतर या ठिकाणी अनुचित प्रकार घडल्याशिवाय राहत नव्हता एवढेच मात्र खरे,या परिसरामध्ये सतत डीपी मधून जाणारे सप्लाय वायर तुटत असल्याने याकडे महावितरणचे कर्मचारी वरिष्ठ कर्मचारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, कुपटी परिसरामधील गावातील पूर्ण डीपी वरील फ्युज नसून डीपी मधून येणाऱ्या सप्लायलाच वायर जोडून दिल्यामुळे हा प्रकार घडत आहे, यामुळे कोणाची जीवित हानी झाली तर याला जबाबदार महावितरणचे वरिष्ठ कर्मचारी व कनिष्ठ कर्मचारी हे राहतील असा सवाल कुपटी येथील गावकरी उपस्थित करत आहेत, जिल्हा परिषद च्या विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी वायर तुटलेले आहेत त्या ठिकाणी महावितरण चा जाहीर निषेध केला आहे, हा रस्ता गावातील मुख्य असल्यामुळे व या ठिकाणी लागून असलेली जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व ग्रामपंचायत कार्यालय येथे कामानिमित्त येणारे गावकरी यामुळे या ठिकाणी नेहमी वर्दळ असतो. सुदैवाने वायर तुटलेल्या ठिकाणी कोणी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असे म्हणावे हरकत नाही, कुपटी येथील पूर्ण गावांमधील सप्लाय होणारी तारा ही लोमकळीस आली असून या ठिकाणीही तारा काढून दुसरे नवीन बसवावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे, जवळपास ५० वर्षापासून तेच तारा असल्यामुळे हे तार आता जीर्ण होत आहे, त्यामुळे हा प्रकार घडत आहे, पूर्ण गावांमधील नवीन तार बसवावी नाही बसविल्यास येत्या १५ ऑगस्ट ला गावातील युवा सरपंच यांच्या नेतृत्वात माहूरच्या महावितरण कार्यालया येथे भव्य असा मोर्चा काढू असे सांगितले आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button