Uncategorized

कर्तव्यनिष्ठ पोलीस उपनिरीक्षक विश्वाभर निकम यांचा सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती सोहळापोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन यांच्या हस्ते नांदेड येथे, तर कुंटूर ठाण्याचे पो.नि. वागतकर यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार.

नायगाव

कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि जनसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणारे पोलीस उपनिरीक्षक विश्वाभर दिगंबरराव निकम यांनी तब्बल तीन दशकांहून अधिक काळ महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या प्रदीर्घ, आदर्श आणि लोकाभिमुख सेवेला गौरव म्हणून कुंटूर पोलीस ठाणे तसेच जिल्हा पोलीस मुख्यालयात त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. विश्वाभर दिगंबरराव निकम यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील अंचोली या गावातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण अंचोली येथे, पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण कोलंबी येथे, तर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मांजरमी येथे झाले. त्यानंतर अकरावीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण शिवाजी महाविद्यालय, कंधार येथे, तर पदव्युत्तर शिक्षण सायन्स कॉलेज, नांदेड येथे पूर्ण केले. सन १९९२ मध्ये त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश केला. सेवाकाळात नांदेड, कंधार, मुखेड, उमरी आणि कुंटूर येथे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. कर्तव्यदक्षता, शिस्त, प्रामाणिकपणा आणि नागरिकाभिमुख कार्यशैलीमुळे त्यांनी अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विश्वासाचे आणि सन्मानाचे स्थान निर्माण केले. कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहेर बिटमध्ये कार्यरत असताना त्यांनी सर्व समाजघटकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. अनेक कौटुंबिक, सामाजिक व गावपातळीवरील तंटे सामोपचाराने सोडवून संबंधितांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या शांत, संयमी आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे परिसरातील नागरिकांचा त्यांच्यावर विशेष विश्वास निर्माण झाला होता. नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असताना दिनांक ३० जुलै २०२६ रोजी कुंटूर पोलीस ठाण्यात कुंटूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक वागतकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवाकार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी जिल्हा पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन यांच्या हस्ते विश्वाभर दिगंबरराव निकम व त्यांच्या सौभाग्यवतींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी राहेर येथे ग्रामस्थांच्या वतीने वं सपोनि विशाल भोसले यांच्या हस्ते या प्रसंगी त्यांचा विश्वाभर निकम यांचा सहपत्नीक सत्कार केला तसेच त्यांच्या निष्ठावान, प्रामाणिक आणि उत्कृष्ट सेवेला गौरवोद्गार अर्पण करण्यात आले तसेच त्यांच्या निरोगी, आनंदी आणि सुखसमृद्ध निवृत्त जीवनासाठी राहेर ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. तीन दशकांहून अधिक काळ निष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव जपत बजावलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार तसेच नागरिकांकडून पोलीस उपनिरीक्षक विश्वाभर दिगंबरराव निकम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button