Uncategorized

माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेली विविध कामे तातडीने पूर्ण करन्यासाठी आमरण उपोषणास सुरवात श्रीक्षेत्र माहूर!.

श्रीक्षेत्र माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग (क्र. १६१अ )वरील विविध विकासकामे गेल्या पाच वर्षांपासून रखडली आहेत. ती कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, यासाठी दि.२८सप्टेंबर पासून आमरण उपोषणास माहूर नगरीतील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राज ठाकूर व अपिल बेलखोडे यांनी सुरवात केली आहे . दिलेल्या निवेदनात धनोडा ते कोठारी या राष्ट्रीय महामार्गाचे काही काम पूर्ण झाली आहेत, तर अनेक महत्त्वाची कामे अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिक, भाविक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा उल्लेख केला आहे. माहूर शहरातील न्यायालय ते ग्रामीण रुग्णालय या मार्गावरील सर्व पथदिवे बंद असल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आहे.त्याचा फटका शहर वासियांसह भाविकांना बसतो आहे.तसेच दत्त चौक (टी-पॉईंट )ते ग्रामीण रुग्णालय या मार्गाच्या दोन्ही बाजूंना पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाचे सुशोभीकरण तसेच रखडले आहे. दुभाजकावर शोभेची झाडे लावण्यात आलेली नाहीत, याशिवाय संरक्षक जाळीही बसविण्यात आली नसल्याने वारंवार अपघात होत असल्याचा आरोप त्यांनी निवेदनातून केला आहे.या व्यतिरिक्त पैनगंगा नदीवरील धनोडा–माहूर नवीन पूल आजपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नसल्याने प्रवाशी व भाविकांना जुन्या पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. जुन्या पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.माहूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री रेणुकामाता मंदिराचे स्थान, भगवान दत्तात्रेयांचे जन्मस्थान, अनसूया माता मंदिर, कैलास टेकडी, बाबा सोनापीर दर्गा, शेख फरीद धबधबा, पांडव लेणी, रामगड किल्ला आणि मातृतीर्थ यांसारख्या धार्मिक व पर्यटनस्थळांमुळे प्रसिद्ध आहे. दररोज हजारो भाविक आणि पर्यटक येथे येत असल्याने नवरात्र महोत्सवापूर्वी ही सर्व प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांच्या निवेदनात नमूद आहे.सदरच्या कामांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास, दि. २८ सप्टें.ला राष्ट्रीय महामार्ग वरील माहूर शहरातील दत चौक (टि पॉईंट) येथे आमरण उपोषण सुरू केले असून याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासना वर असेल , असा इशारा राज ठाकूर व अपिल बेलखोडे यांनी निवेदनातून दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button