
काही नेते पक्ष सोडून गेले असले तरी मतदार जागेवरच असल्याने यश मिळण्याचा ठाम विश्वास
माहूर- आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक कॉंग्रेस पक्ष ताकदीने लढणार वाई बा. व वानोळा जि.प. गटात उमेदवारी मिळण्यासाठी अनेक जण इच्छुक असून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष हा एक व्यापक विचार आहे. काही नेते पक्ष सोडून गेले असले तरी कॉंग्रेस पक्षाचा मतदार हा ठामपणे आपल्या जागेवर असल्याने भारतीय राष्ट्रिय कॉंग्रेस पक्षाची उमेवारी मिळविण्यासाठी प्रयत्न शील असल्याची माहिती वि.जा.भ. ज. सेल चे जिल्हाध्यक्ष किसन दामा राठोड यांनी दिली.
वाई बा. जि.प. गटात डॉ. सुप्रिया गावंडे, गोरसेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल जाधव, पिंटू पाटील वायफनीकर, जब्बार शेख वाईकर व वानोळा जि.प. गटात माजी जि.प. सदस्य स्व. दतरामजी राठोड यांचे सुपुत्र कृष्णकुमार राठोड व स्वतः किसन दामा राठोड हे इच्छुक आहेत असून चारही पं.स. गणात सुद्धा लढाऊ व अभ्यासू कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार असून वाई प.स. गणात सचिन बेहेरे सह अनेक जण तर वानोळा, गोंडवडसा व हडसनी गणात सुद्धा अनेक जण पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून माहूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक कष्टकरी शेतमजूर व शेतकरी यांच्या विविध समस्या अडचणी सोडविण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने केलेले कार्य देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे विरोधीपक्षनेते खा. राहुल गांधी यांचा नफरत के बाजार मे मोहबत की दुकान चालविण्याचा कानमंत्र कट्टर कॉंग्रेसीनी आत्मसात केलेला आहे. कॉंग्रेस पक्षाचे बब्बर शेर कार्यकर्ते संघर्षासाठी सदैव तत्पर असून देशाचे वातावरण सुद्धा झपाट्याने बदलत असल्याचे चित्र असल्याने आगामी जि. प.,प.स. सार्वत्रिक निवडणुकीत माहूर तालुक्यातील दोन्ही जी.प. गटातून आगामी निवडणुकीत तगडे उमेदवार उभे करण्यात येईल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , खा. रवींद्र चव्हाण व जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांची भक्कम साथ माहूर तालुका कॉंग्रेसला असून काही नेते पक्ष सोडून गेले असले तरी कॉंग्रेस पक्षाच्या विचारधारा मानणाऱ्या सच्चा कार्यकर्त्याच्या व मतदारांच्या भक्कम पाठींब्याने व परिश्रमाने माहूर पंचायत समितीवर कॉंग्रेस पक्षाचा तिरंगा डौलाने फडकलेला असेल तसेच दोन्ही जि.प. गटात कॉंग्रेस उमेदवारच हमखास निवडून येतील असा विश्वास किसन दामा राठोड यांनी व्यक्त केला आहे.

