
नायगाव :
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या नांदेड जिल्हा आढावा बैठकीत सामाजिक कार्यकर्ते ओम पाटील शिंदे कोलंबीकर यांची पुन्हा एकदा जिल्हा उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
या आढावा बैठकीत जिल्ह्यासह विविध आघाड्यांवरील नवनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसर्कर, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा प्रा. रेणुकाताई मोरे, नॅन सहाय्यक आघाडी प्रदेशाध्यक्ष गजानन मोने, मराठवाडा कार्याध्यक्ष जनार्धन पाटील वडवळे तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान शेतकरी, विद्यार्थी आणि कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना हमीभाव, विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी आणि कामगारांच्या हक्कांबाबत संघटनेने ठोस भूमिका घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच संघटनेच्या पुढील कार्ययोजनांची रूपरेषा निश्चित करण्यात आली.
ओम पाटील शिंदे कोलंबीकर यांच्या निवडीमुळे कोलंबी परिसरासह नायगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

