ताज्या बातम्याधार्मिकनांदेडनायगाव

कोलंबी दत्त संस्थान येथे श्री १०८ श्री स्वामी गंभीरबन गुरु प्रसादबन महंत महाराज यांची १५ वी पुण्यतिथी — भक्तीभावाने उजळणार श्रद्धेचा सोहळा.

नायगाव तालुक्यातील मोजे कोलंबी येथील प्रसिद्ध श्री दत्त संस्थान येथे परमपूज्य श्री १०८ श्री स्वामी गंभीरबन गुरु प्रसादबन महंत महाराज यांच्या १५ व्या पुण्यतिथीचे आयोजन मि. कार्तिक शुद्ध सप्तमी, बुधवार, दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले आहे.

सकाळी १० वाजता समाधी पूजन व अभिषेकाचा पवित्र विधी पार पडणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धा, भक्ति आणि परंपरेचा संगम घडविणारा हा कार्यक्रम भाविकांसाठी अत्यंत मंगलमय ठरणार आहे.

कोलंबी दत्त संस्थान हे नांदेडसह पंचक्रोशीतील दत्तभक्तांचे अखंड श्रद्धास्थान मानले जाते. येथे असलेले ऐतिहासिक ब्रह्मयंत्र हे संस्थानाचे वैशिष्ट्य असून, दरवर्षी हजारो भक्तगण या पवित्र स्थळी दर्शनासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहतात.

या पुण्यतिथीनिमित्त दत्त संस्थान कोलंबीचे मठाधिपती श्री श्री १०८ यदुबन महाराज, विश्वस्त मंडळ तसेच समस्त गावकरी मंडळींनी सर्व भक्तजनांना या पवित्र सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा वारसा जोपासणाऱ्या या पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थित राहून आशीर्वाद लाभावा,” — असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!