ताज्या बातम्यानांदेड

काँग्रेस पक्षातर्फे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न.

माहूर : जयकुमार अडकिने

माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने कपिलेश्वर धर्मशाळा येथे माहूर तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे बैठक आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये काँग्रेसचे नांदेड जिल्हा अध्यक्ष राजेश जी पावडे साहेब यांचे अध्यक्षतेखाली माहूर तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषदा व चार पंचायत समिती मधील इच्छुक उमेदवारांचे मुलाखती घेण्यात आले.

बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या समवेत कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण पक्ष निरीक्षक व अजीज कुरेशी शहराध्यक्ष अल्पसंख्यांक सेल, जिल्हा सचिव काँग्रेस कमिटी अनिल पाटील चिमेगावकर, भजावि ज चे जिल्हाध्यक्ष किसन राठोड, जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे, जिल्हा उपाध्यक्ष मंचकराव देशमुख,काँग्रेस प्रवक्ता जयकुमार अडकिने, नांदेड जिल्हा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष शेख जब्बार,माहूर नगरपंचायतच्या मा.उपाध्यक्षा सौ. अश्विनी आनंद पाटील तुपदाळे,जिल्हा उपाध्यक्षा डॉ.सुप्रिया गावंडे, नगरसेविका सौ. कविता सौंदलकर, नगरसेविका सागर राठोड, नगरसेविका प्रतिनिधी निसार भाई, विक्रम राठोड, राजू सौंदलकर, विधानसभा उपाध्यक्ष सचिन बेहेरे,जगदीश पाटील तुपदाळे, साजिद शेख, जमीर खान, शरीफ शेख, मन्नाण शेख, अहेमद कुरेशी, जावेद भाई, शहराध्यक्ष अजीम सय्यद, यांच्यासह हजारो काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

बैठकीचे आयोजन नांदेड जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी आनंद पाटील तुपदाळे यांनी केले माहूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!