
श्रीक्षेत्र माहूर :
माहुर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनतापार्टी तालुका माहूरच्या वतीने मंगळवार दि. 22 जुलै रोजी स. 9 ते दु.4 वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, त्यात 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचा शुभारंभ स्वच्छतादूत साईनाथ महाराज, श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त संजय काण्णव यांचे हस्ते श्री रेणुकामातेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाला.पो. नि. गणेश कराड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे, शहराध्यक्ष गोपू महामुने, तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के,युवा मोर्चाचे प्रदेश सचिव संदीप राठोड,माजी तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर, तालुका सरचिटणीस विनायक मुसळे, डॉ. रवी मेंडके,अनिल वाघमारे,माजी तालुका सरचिटणीस अपील बेलखोडे,नंदकुमार जोशी, विजय आमले,विलास चौधरी, श्याम कुमरे, अविनाश भोयर, अशोक जोशी, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पद्मा गिऱ्हे, शहराध्यक्ष स्वाती आडे, तालुका सरचिटणीस अर्चना दराडे,तालुका कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष प्रतिभा पाटील,उर्मिला बनसोड, जयकांत मोरे, विशाल खरे, किशोर आत्राम, निलेश तायडे, पवन चौहान, राजु दराडे, कैलाश फड, कृष्णा जायभाये आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस कुठलीही बॅनरबाजी व जाहिरात न करता लोकोपयोगी उपक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा असे आवाहन केले होते,त्याला अनुसरून घेतलेल्या रक्तदान शिबिरात 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले.ग्रामीण रुग्णालयाच्या दालनात लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पेंटर सुरेश आराध्ये यांनी काढलेली त्यांची रांगोळी सर्वांचे आकर्षनाचे केंद्र ठरले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी भाजपच्या सर्वच आघाड्यानी परिश्रम घेतले.

