ताज्या बातम्यानांदेड

वानोळा प्रा. आ. केंद्रात सुविधाचा अभाव ; रिक्त पदामुळे रुग्णांची गैरसोय.

जयकुमार अडकिने

माहूर तालुक्यातील वानोळा परिसरातील 18 गावांमधील 25 हजार लोकसंख्येची सांभाळणारे वानोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी अवस्थेत असल्याचा अनुभव रुग्णांना येत आहे या आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील अनेक पदे रिक्त आहेत.त्यांच बरोबर डिसेंबर 2019 पासून 8.50 कोटी रुपये निधी खर्च करून नवीन इमारत बांधण्यात येत आहे मात्र अद्याप पर्यंत काम पुर्णत्वास गेले नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना प्राथमिक उपचार करणेही कठीण होत झाले आहे.

माहूर तालुक्यातील वानोळा प्राथमिक आरोग्य केंद्राला काही जवळची गावे जोडल्याने त्या गावातील गोरगरीब व रुग्णांनाही हे प्राथमिक आरोग्य केंद्र गैरसोयीचे ठरते.येथे वैद्यकीय अधिकाऱ्याची दोन पदे मंजूर आहेत मात्र दोन्ही पदे रिक्त असल्याने समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या भरवश्यावर वानोळा प्रा. आरोग्य केंद्राचा कारभार सुरु आहे.

वानोळा प्रा. आ. केंद्रात 4 आरोग्य सेवकांची पदे मंजूर असून 2 पदे रिक्त आहे.प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक पद रिक्त व वाहन चालकाचे पद रिक्त, तसेच आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी 4 पदे मंजूर असून पाचोंदा, कुपटी, पानोळा येथील 3पदे रिक्त आहेत. तर परिचर ची 5 पदे मंजूर असून 1कार्यरत, 3 रिक्त, तर 1प्रतिनियुकीवर असल्याने या रिक्त पदामुळे वानोळा परिसरातील नागरिकांची गैरसोय होतं आहे.

कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रमाची ऐशी-तैशी

वानोळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे बांधकाम मागील सहा वर्षांपासून सुरु आहे.त्यामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर कार्यक्रम मागील सहा वर्षांपासून बंद असून

इतर प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया करून घेण्याची वेळ महिला वर आली आहे.कुटुंब कल्याण शिबीर चा कार्यक्रम होत नसल्याने कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया या राष्ट्रीय कार्यक्रमाची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या तुघलकी कारभाराने ऐसी तैसी झाल्याचे चित्र आहे.

वानोळा प्राथमिक आरोग्य केंद्रातीलही रिक्त पदाबाबत वरिष्टकडे पत्रव्यवहार केला आहे. नूतन इमारत व रिक्त पदाचा प्रश्न वरिष्ट स्तरावरून सुटल्यास दर्जेदार आरोग्य सेवा देण्यास मदत होईल.

-डॉ. अजय राठोड, प्रभारी वैद्यकीय अधिकारी वानोळा.

वानोळा परिसर हा माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असून सर्कल चे ठिकाण आहे. या गावास परिसरातील पंधरा खेड्यातील नागरिकांचा दररोजचा संपर्क येतो. त्यामुळे वानोळा प्रा.आ.केंद्रातील रिक्त पदे प्रशासनाने त्वरित भरावे व नवीन इमारत बांधकामास गती द्यावी. त्यामुळे परिसरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळेल.

अँड.नितेश बनसोडे ; सामाजिक कार्यकर्ता वानोळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!