
नायगाव :- बाळासाहेब पांडे
महाराष्ट्र राज्याचे लोकनेते, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार राजेशजी पवार व सौ. पुनमताई पवार यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
रक्त संकलनासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी ब्लड बँक (नांदेड) तसेच अर्पण ब्लड सेंटर (नांदेड) यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केल्यामुळे उपक्रमाचे महत्व अधोरेखित झाले.
शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते:
बालाजीराव मदेवाड – भाजपा नायगाव तालुका अध्यक्षदेविदास पा. बोमनाळे, सूर्याजी पा. चाडकर, दत्ता पा. ढगे, आवकाश पा. धुपेकर, बळीराम पा. वडजे, राजू पा. बेळगेजयश्रीताई नरवाडे, प्रतिभाताई धानोरकर, पलविताई वडजे, महेश पा. होटाळकर. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडले. मुख्यमंत्री साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी रक्तदान करून त्यांना एक आगळावेगळं अभिष्टचिंतन करण्याचा हा स्तुत्य उपक्रम ठरला.


