Uncategorizedताज्या बातम्यानांदेड

हदगाव तालुक्यांतील उमरी जहागीर येथील वृक्षप्रेमी संजय लगड यांनी स्वखर्चाने श्रमदानातून झाडांना रंगरंगोटी करत केले वृक्ष संवर्धन…

नांदेड:
संजय कोंडिबा लगड हे हदगाव तालुक्यातील उमरी जहागीर येथील रहिवाशी असून ते रोजमजुरी करून आपले घर व संसार चालवतात संजय यांना वृक्षावर असलेले प्रेम त्यांनी यावेळी आपल्या श्रमदानातून दाखवले आहे. आपल्या रोज मजुरीतून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी स्व इच्छेने श्रमदान करीत गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांची रंगरंगोटी केली आहे. संजय यांचे नववीपर्यंत शिक्षण झालेले असून, गावातील विकासाच्या उपक्रमात ते नेहमी सहभाग घेत असतात. संजय यांनी उमरी येथील बसथांब्यापासून गावात जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूची अनेक झाडांना तिरंगी रंगाने रंगवित निसर्गप्रमाला राष्ट्रप्रेमाची जोड देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे झाडांचे सौंदर्य अजून खुलले असून, गावात जाताना आनंददायी चित्र निर्माण झाल्याचे आपणास पहावयास मिळत आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!