ताज्या बातम्यानांदेडनायगाव

कुंटूर येथील रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची बि डिओ कडून पाहनी ..

घरकुल बांधकाम करणाऱ्यांना बिल मिळणार नागरिकांतून समाधान व्यक्त

कुंटूर प्रतिनिधी:- अनिल कांबळे
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील प्रधानमंत्री व राज्य पुरस्कृत योजनेचे अनेक घरकुलचे कामाची पाहणी व काहींची अर्धवट बांधकामाची पाहणी गावात जाऊन पंचायत समिती गटविकास अधिकारी एल आर वाजे व जेई संतोष आडे यांनी सदर घरकुलच्या घरोघर जाऊन पाहणी व तपासणी केली संपूर्ण बांधकाम केले त्यांचे अभिनंदन केले व अर्धवट बांधकाम राहिली त्यांना पूर्ण करण्याची सांगीतले . ज्यांनी बांधकाम सुरुवात केली नाही त्यांना दोन महिन्याच्या आत घरकुल बांधकाम सुरू करा पूर्ण बिल तुम्हाला देण्यात येईल अशी माहिती यावेळी गटविकास अधिकारी एल आर वाजे यांनी सदर घरकुलधारकांना दिले आहे. तुमचे पूर्ण बिल मिळणार तुम्हाला घरकुल चा पूर्ण पैसा मिळेल पण घरकुल बांधकाम करा व ते तुम्हालाच चांगला फायद्याचा आहे . असे यावेळी त्यांनी मार्गदर्शन गावकऱ्यांना केले आहे . त्यामुळे गावातील नागरिकांनाही दोन महिन्यात घरकुल पूर्ण करणार आहोत अशी आश्वासनही गटविकास अधिकारी यांना दिले आहे. गावामध्ये संपूर्ण घरकुल बांधकाम पूर्णत्वाकडे आले आहे. काही पूर्णत्वाकडे न आले त्यांना लवकरच घर पूर्ण करणार असल्याचे आश्वासने यावेळी गटविकास अधिकारी यांना दिले . त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे . प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल आवास योजनेच्या घराची विले तात्काळ नागरिकांच्या खात्यात जमा केली आहेत .व काहींना बील जमा लवकरच होणार आहे. त्यानुसार घरकुलचे बांधकाम पूर्ण करा असे यावेळी घरकुल ना लाभार्थ्याना बि डी ओ यांनी माहिती दिली. यावेळी उपस्थित नायगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी एल्लार वाजे घरकुल जे इ संतोष आडे ग्रामपंचायत सदस्य सुधाकर झुंजारे घरकुलधारक लाभार्थी व महिला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!