
नायगाव
नांदेड जिल्ह्यातून उत्कृष्ट आयसीडी ट्रेनर म्हणून नायगाव येथील कन्या शाळेचे अरविंद पदमांवार यांची निवड झाली आहे.छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या कार्य शाळेत पद्मावार यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये विभागीय आयसीटी संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन व मार्गदर्शन एकदिवसीय कार्यशाळा दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी सपन्न झाली. छत्रपती संभाजी नगर विभागातील आठ जिल्ह्यांमधील 349 संगणक प्रशिक्षक यांच्यासाठी संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन व मार्गदर्शन या विषयाशी अनुसरून एक दिवशीय कार्यशाळा मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती.
आधुनिक युगात टीकायचे असेल तर विद्यार्थ्यांना संगणकाशी मैत्री करावी लागेल व त्याच्यासाठी त्यांना संगणक हाताळण्याची सवय लावण्यासाठी तसेच त्यांच्या मनातील डिजिटलायझेशन विषयीची भीती दूर करण्यासाठी,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई संचालक माननीय श्री संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन व मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजी नगर विभागातील 647 शाळा व गटसंधान केंद्र येथे संगणक प्रयोगशाळेसाठी संगणक प्रशिक्षक देण्यात आले असून त्यांना मार्गदर्शनासाठी ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती.या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मनपा छत्रपती संभाजी नगर सांगळे सर लाभले होते. ते या मध्ये नांदेड जिल्ह्यातून उत्कृष्ट ट्रेनर म्हणून अरविंद पद्मावर या नायगाव च्या जिल्हा परिषद कन्या शाळा येथे ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या पद्मावार यांना देण्यात आला. पद्मावार यांना दिलेला पुरस्कार म्हणजे त्यांनी या कार्यात केलेले काम होय.

