
नायगाव
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, शाखा नायगाव च्या वतिने,भगवान परशुराम जयंतीनिमित्त दिनांक 29 एप्रिल 25 रोज मंगळवार रोजी महाआरती, फळ वाटप ,महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी आठ वाजता पारनेरकर महाराज गणपती मंदिर शेळगाव रोड येथे महाआरती दुपारी चार वाजता कुलस्वामिनी इलेक्ट्रिकल दुकान शेळगाव रोड येथे सेवानिवृत अधीक्षक प्रशांत बिलवणीकर (कुलकर्णी ) शरदचंद्र महाविद्यालय नायगाव यांचा सत्कार, सायंकाळी साडेचार वाजता ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे रुग्णांना फळे वाटप.
तर सायंकाळी पाच वाजता तालुका अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांचे बेटकबेली रोडवरील दिवाणजी फॉर्म हाऊस वर मान्यवर यांच्या हस्ते परशुराम प्रतिमा पूजन,महाआरती, वंचित घटक सत्कार सन्मान व महाप्रसाद वाटप कार्यक्रम होणार आहे. सर्वां ब्रह्म वृंद यानी कार्यक्रमात सहभाग घ्यावा अशी विनंती तालुका अध्यक्ष आ.भा.ब्राह्मण महासंघ (पुरुष व महिला,युवा आघाडी व डॉ.आनंदी बाई जोशी महिला बचत गट नायगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

