
कार्यकारी संपादक बाळासाहेब पांडे
नायगाव, शासकीय सेवेत यशस्वी प्रवेश करणाऱ्या नवनिर्वाचित कर्मचारी आणि विविध परीक्षांमध्ये उज्ज्वल यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा घुंगराळा येथे भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दिनांक २८ जून २०२५ रोजी, शनिवारी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत घुंगराळा येथे संपन्न होणार आहे.
या गौरव सोहळ्याचे मान्यवर सत्कारमूर्ती म्हणून लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार प्रतापराव पा. चिखलीकर हे विशेष उपस्थिती मध्ये राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. शिवराज पा. होटाळकर (सभापती, जिल्हा परिषद नांदेड) हे राहणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीपराव धर्माधिकारी (जिल्हाध्यक्ष, नांदेड), मिनलताई खतगावकर (सदस्य, जि. प. नांदेड), बालाजीराव शिंदे (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नांदेड), तसेच अशोक पा. मुगावकर (उपसभापती, पं. स. बिलोली) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजक वसंत सुगावे पाटील (प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व उपसरपंच, ग्रामपंचायत घुंगराळा) हे आहेत त्यांनासौ. रुक्मिणीबाई पांचाळ (सरपंच, घुंगराळा)श्यामराव यमलवाड (चेअरमन, सेवा सहकारी सोसायटी, घुंगराळा) माधवराव पा. ढगे (अध्यक्ष, शालेय समिती, जि. प. हायस्कूल, घुंगराळा)चंद्रप्रकाश पा. ढगे (व्हा. चेअरमन, सेवा सहकारी सोसायटी, घुंगराळा) श्यामसुंदर पा. ढगे (अध्यक्ष, तंटामुक्ती समिती, घुंगराळा) यांचे नियोजनात सहकार्य आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील युवा पिढीला प्रेरणा मिळावी, याकरिता हा सोहळा आदर्श ठरणार आहे. गावाच्या सर्व क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी उपस्थित राहून गावात येणाऱ्या नव्या कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे
हे सत्कारापुरती मर्यादित न राहता, एका प्रेरणादायी सामाजिक चळवळीची नांदी ठरणार आहे — शिक्षण व सेवाभावाला नवा उजाळा देणारा हा सोहळा निश्चितच स्मरणात राहील! असा विश्वास वसंत सुगावे यांनी व्यक्त केला आहे.

