
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शहापूर येथील शेतकऱ्यांनी 2 एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी घटल्याने मुंजाजी शिरसागर या शेतकऱ्याची 2 एकर वरील केळीची बाग उभी वाळली आहे. या शेतकऱ्याने एकूण आपल्या शेतात 13 बोरवेल घेतले असून एकाही बोरवेलला पाणी नसल्याने शेतकऱ्याचे केळीचे उत्पादन हातचे केले आहे. लाखो रुपयाचा खर्च करून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडल्याने सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी मुंजाजी शिरसागर यांनी केली आहे.

