
हदगाव
जम्मू काश्मीरच्या पहलगामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट सुरू आहे. पहलगामा येथे दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीयांचा बळी घेतला. या घटनेच्या निषेधार्थ आज हदगांव तालुका व शहरात कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला.या बंदमध्ये शिंदे गटाचे आमदार बाबुराव कदम यांनी सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला व विविध पक्ष हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या..

