ताज्या बातम्यानांदेडनायगाव

कोलंबी केंद्राचे संमेलन सोमठण्यात मा. दीनानाथ मंगेशकर विद्यालयात सपन्न .

नायगाव
कोलंबी संकुलातील शैक्षणिक वर्ष २०२४ ते २५ या शैक्षणिक वर्षातील शेवटचे केंद्रस्तरीय संमेलन मास्टर दिनानाथ मंगेशकर हायस्कूल सोमठाणा येथेसंपन्न झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय पी.एस वरवटे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी प्राचार्य तथा विद्या विकास शिक्षण प्रसारक मंडळ सोमठाण्याचे अध्यक्ष आदरणीय मनोहरराव पवार साहेब, कोलंबी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोलंबीचे मुख्याध्यापक आदरणीय डोमसेर सर, आदरणीय श्री शंकरराव चव्हाण हायस्कूल कोलंबीचे एन आर पांडे सर, सोमठाणा येथील जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापिका गव्हाणे मॅडम तर कोलंबी संकुलातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक मुख्याध्यापक प्रतिनिधी तथा शिक्षक बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी या कार्यक्रमांमध्ये उपस्थित सर्वांचे मास्टर दीनानाथ मंगेशकर हायस्कूल चे आदरणीय एम.टी वाघमारे आणि विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केले .या कार्यक्रमांमध्ये सुलभक म्हणून आदरणीय बुधप्पा सर,श्री तेहरा सर, श्री गोपतवाड सर श्री स्वामी सर यांनी उपस्थितीत शिक्षकांना नवीन शैक्षणिक धोरण शिक्षण क्षेत्रातील अडीअडचणी यावर अत्यंत सुलभ पद्धतीने मार्गदर्शन केले.
केंद्रांतर्गत सर्व मु.अ ,शिक्षक सर्व उपस्थितीत होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिप्परग्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदरणीय धम्मदीप जी गायकवाड यांनी केले. तर आभार एम टी वाघमारे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!