
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे 134 वि जयंती 29 एप्रिल रोजी साजरी बाबासाहेबांनी दिलेल्या अष्टांगित मार्गाचा अवलंब करून शिका संघटित व संघर्ष करा या मूलमंत्राचा अर्थ बौद्ध समाजातील सर्व नागरीक यानी समजून घ्यायला हवे राहणे, स्वच्छ राहणी नीटनेटकेपणाने वागणे आपल्या मुलांना शिक्षण देणे मुलांना जशी वागणूक आपण देता तसेच ते पुढे चालून चांगल्या मार्गाने वाटचाल करतील. आपण घरातील स्वच्छ व चांगले वातावरण निर्माण केले तर मुले ही तेच शिकतील असे प्रतिपादन बाबुराव पाटील अडकिने यांनी व्यक्त केले ते कुंटूर येथील भीम जयंती मंडळ कार्यक्रमानिमित्त अध्यक्ष त्यांनी बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले , बाबासाहेबांनी अनेक हाल अपेक्षा सहन केल्यावर आपल्या लोकांना न्याय मिळवून दिला बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांची प्रेरणा पुढे चालू ठेवण्यासाठी आपण भीम जयंती साजरी करतो मात्र त्या जयंतीचा उद्देश आपण समजून घ्यायला हवा चांगले राहणे आपला घर सुधारणे समाज सुधारणे त्याचबरोबर मुलांना शिक्षण देऊन त्यांना उच्च पदावर नोकरी व चांगल्या उद्योगधंद्याला लावणे हे आपला मार्ग आहे. त्यामुळे कोणतेही वेसन दारू व्यसना आहारी जाऊ नये हीच खरी बाबासाहेबांना अभिवादन ठरेल. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन जयंती साजरी करा असे मत सूर्याची पाटील चाडकर यांनी व्यक्त केले. बौद्धिसत्व बुध्द विहार कुंटूर येथे पंचशील ध्वजारोहन यांच्या हस्ते करण्यात आले. भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करू पूजा करण्यात आली . यावेळी सूर्याची पाटील चाडकर, शिवाजी पाटील होळकर उपसरपंच कुंटूर ,सूर्यकांत पाटील कदम, मारुती पाटील कदम, बाबुराव पाटील आडकिने ,लक्ष्मण पाटील अडकिने , दत्ता नालीकंठे,रसूल मखनसाब शेख, गोविंद कंधारे पोलीस हेडकॉन्स्टेबल, रजाक गुजीवाले, तुकाराम पोतंगले, जंगजेराव पाटील कदम,, पवन कुमार पुट्टेवाड पत्रकार, शंकर पाटील अडकिने पत्रकार, अनिल कांबळे पत्रकार , बालाजी हनमंते पत्रकार, सिध्दार्थ गजभारे पत्रकार, आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी समता सैनिक दलाच्या महिलांनी सदर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले .यावेळी महिला पुरुष व बालक यांचे भाषणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत समाज उपयोगी मार्गदर्शन केले. नवयुवक भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष सचिव व सर्व कार्यकारी मंडळ कुंटूर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गावातील, प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यां कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी हनमंते आभार दिलीप गजभारे यांनी मानले.

