
नायगाव
परशुरामाचे शौर्य लक्षात घेऊन ब्राह्मण समाजाने धाडसाने विधायक संघटन कार्य करने ही काळाची गरज असुन ब्राह्मण समाज धाडस दाखवण्यात कमी पडू नये या साठी संघटन शक्ती च्या रूपाने एकत्रित येऊन कार्य केल्यास ब्रह्म शक्ती वाढेल असे विचार परशुराम जन्मोत्सव कार्यक्रमात बाळासाहेब पांडे यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले.
नायगाव येथे आखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने २९ एप्रिल मंगळवार रोजी श्री भगवान परशुराम जन्मोत्सव हा फळ वाटप,लाडक्या बहिणीचा ,वंचित घटक सन्मान,महा आरती,धार्मिक व सामाजिक उपक्रमाने साजरा
करण्यात आला.
सकाळी आठ वाजता पारनेरकर महाराज गणपती मंदिर शेळगाव रोड येथे पूजन महाआरती करून जयंती उस्थव ला सुरुवात करण्यात आली. दुपारी चार वाजता कुलस्वामिनी इलेक्ट्रिकल दुकान शेळगाव रोड येथे सेवानिवृत प्रशांत बिलवणीकर (कुलकर्णी ) अधीक्षक शरदचंद्र महाविद्यालय नायगाव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला, सायंकाळी साडेचार वाजता ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे रुग्णांना डॉ सोनकांबळे साहेब,शेख सिस्टर,ब्रह्म मित्र भा.ग.मोरे ,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे,प्रज्योत कुलकर्णी, व ब्रह्म वृंद यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालय नायगाव येथील सर्व रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तर सायंकाळी पाच वाजता तालुका अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांचे बेटकबेली रोडवरील दिवाणजी फॉर्म हाऊस वर
आखिल भारतीय ब्राह्मण महासंघ जिल्हाध्यक्ष ग्रामीण बाळासाहेब पांडे मांजरमकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर यांच्या हस्ते परशुराम प्रतिमा पूजन,महाआरती, वंचित घटक सत्कार सन्मान अंतर्गत शेत मजूर व लाडक्या भगिनी यांचा सत्कार करण्यात आला या वेळी विशेष अतिथी म्हणून अमोल टोंपे प. स. अधीक्षक नायगाव ,सागर कुलकर्णी बँक मॅनेजर दिनदयाळ बँक,ब्रह्म मित्र भा. ग.मोरे,गोपाळ कुलकर्णी नरसी, ऍड निलेश देशपांडे, संदीप कुलकर्णी ए. एस.आय.नायगाव पोलिस ठाणे यांची उपस्थिती होती.
लहान मुली कुमारी कुलकर्णीने गणपती स्तवन नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत वाढवली.तर या वेळी शुभम कुलकर्णी,रोहिणी देशपांडे,सुनीता कुलकर्णी ,संदीप कुलकर्णी, ॲड निलेश देशपांडे,भा. ग मोरे,सागर कुलकर्णी ,अमोल टोम्पे,आदीने परशुराम गौरव व कार्य या वर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीते साठी युवा जिल्हाध्यक्ष प्रज्योत कुलकर्णी,तालुका अध्यक्ष प्रसाद दिवाणजी, ॲड राजेश कुलकर्णी,प्रदीप जोशी,मेहता जी ,राजू कुलकर्णी नरसिकर ,धनंजय कुलकर्णी , उमेश नायगावकर,वैभव अंजनीकर,सुनील देसाई,रोहन जोशी, ऍड कुलकर्णी देगलूरकर,श्रीनिवास पांडे,शुभम कुलकर्णी,धनंजय बुयरे,आ.भा.ब्राह्मण महासंघ पुरुष व महिला,युवा आघाडी पदाधिकारी व डॉ.आनंदी बाई जोशी महिला बचत गट महिला यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन सहकार्य केले.शेवटी सुनीता कुलकर्णी घुलेकर यांनी गायिलेल्या गाण्याने व महाप्रसाद वाटप कार्यक्रमाने सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन मंगेश देशपांडे यांनी तर आभार श्याम कुलकर्णी यांनी मानले…..

