नायगाव तहसील कार्यालय येथे सस्ती आदालत योजने अंतर्गत ९ मे रोजी पहिली आदालत तहसील कार्यालय नायगाव येथे आयोजित करण्यात आली असून या मध्ये शेत व पांदण रस्ते मोकळे करून घेण्या साठी ही आदालत होत आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन तहसील कार्यालय नायगाव च्या वतीने परिपत्रक द्वारे आवाहन केले आहे.
विभागीय आयुक्त अपती संभाजीनगर यांचे दि. 16 एप्रिल 2025 रोजीच्या परिपत्रकान्वये नायगाव तालुक्यातील सर्व शेतक-यांना आवाहन करण्यात येते कि, शेतरस्ते पाणंद रस्ते मोकळे करून घेण्याच्या प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी पंधरा दिवसातुन एकदा सस्ती अदालत उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सदर उपक्रम राबविणेकरीता प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या शुक्रवारी तालुकास्तरावर समितीचे आयोजन करण्यात आलेले असुन त्याअनुषंगाने नायगांव तालुक्यातील तालुका स्तरावर समितीची बैठक दिनांक ९/५/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा तहसील कार्यालय नायगांव येथे आयोजीत करण्यात आली आहे. उक्त समितीत तहसिलदार व गटविकास अधिकारी हे अध्यक्ष असुन उपअधिक्षक भूमी अभिलेख, उपअभियंता बांधकाम विभाग जि.प./पं.स., पोलीस निरिक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, नायब तहसीलदार महसुल, है सदस्य असुन तसेच सर्व मंडळ अधिकारी है सहायक सदस्य असुन सर्व संबंधीतांना परिपत्रकाव्दारे लेखी अवगत करण्यात आले आहे.
सदर सस्ती अदालत या उपक्रमामध्ये संबंधित नागरिक यांचे गाव नकाशावरील असलेले शेतरस्ता/ पांणद रस्त्यावरील अतिक्रमण काढणे बाबतची प्रकरणे सर्व संबंधित शेतकरी यांचेसोबत चर्चा करुन तसेच समुउपदेश करून सामंजस्याने निकाली काढण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. दिनांक ९/५/२०२५ रोजी होणा-या प्रथम सस्ती अदालत मध्ये भाग घेणे साठी नायगांव तालुक्यातील सर्व नागरीकांनी सहभाग नोंदविणे असे आवाहन पत्रकातून केले आहे.

