ऐतिहासिकनांदेडनायगाव

शंकरराव चव्हाण विद्यालयाच्या माजी वर्गमित्रानी भरवली शाळा.

कोलंबित घडवून आणला गुरू शिष्य यांचा अनोखा स्नेह मेळा.

नायगाव:- बाळासाहेब पांडे

श्री शंकराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलंबी येथील१९९८- ९९ च्या इयत्ता दहावी च्या बॅच मधील विद्यार्थ्यांनी तब्बल २६ वर्षांनी कोलंबी येथील प्रवीण बियाणी यांच्या फॉर्म हाऊस येथे मंगळवारी सर्व वर्ग मित्रांचा मैत्रीचा अनोखा स्नेह सोहळा भरवाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ जिल्हा परिषद शिक्षिका बिडवई मॅडम या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून,पी. बी.वाघमारे ,वाय. एफ आदमनकर सर, व्हि.जी.आमिलकंठवार,लक्ष्मण कंधारे,आडेपवार सर, ए.एच.बामणे सर,बी एस नीलावार,एन.आर.पांडे सर ,सिरसे एस.बी.,एस. एन.रामशेटवाड सर,हे उपस्थितीत होते.
या वेळी सर्व प्रमुख अतिथी विद्यार्थी, यांनी आपले मनोगत व अनुभव कथन व्यक्त केले.शेवटी त्या काळातील विद्यार्थी गौस मस्तान सय्यद यांनी गायिलेल्या मैत्रीच्या आठवणीचा धागा स्पष्ट पने उमटला .उत्कृष्ट चित्रपट गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .शेवटी मयत झालेल्या गुरुवर्य,व विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद पानगटवाड यांनी तर कार्यक्रमाचे संचलन बालाजी परिहार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार रत्नप्रदीप मुधळे यांनी मानले. एक शिक्षक झालेला विद्यार्थी प्रल्हाद पानगटवाड सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या घडवण्याने मी आज घडलो ही भावना व्यक्त केली वाघमारे यांच्या सविस्तर मार्गदर्शनाने,बाळासाहेब पांडे सर यांनी सादर केलेल्या कवितेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी पुणे मुंबई,नाशिक,कोकण,आदी ठिकाणाहून आलेले २० ते ३० वर्गमित्र उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!