ताज्या बातम्यानांदेडनायगावप्रशासकीय

कुंटूर येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील सर्वे चालू.

 

नायगाव कुंटूर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोणीही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने दुसऱ्या टप्प्यातील ऑनलाइन सर्वे करण्यासाठी जिल्हा तालुका व गाव पातळीवर संबंधित ग्रामपंचायत नगरपंचायत सूचना देऊन ऑनलाईन सर्वे करण्याचे निर्देश जारी केले असल्याने या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी कुंटूर येथील ग्रामसेवक यरसनवार यांनी सर्वे मधुन काढता पाय घेत ग्रामसेवक कदम सूर्यकांत गंगाधरराव यांच्या वर जबाबदारी ढकलून टाकले कदम ग्रामसेवक व संघनक चालक प्रल्हाद अडकिने हे आपले कर्तव्य समजून गावातील प्रत्येक वार्डातील कुटुंबाचा डोर टू डोअर जाऊन पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल योजने पासून कोणीही वंचित राहू नये म्हणून स्वतः जातीने लक्ष घालून ऑनलाईन सर्वे करत आहेत.

ग्रामीण भागातील सामान्य जनतेला पक्के व हक्काचे घर असले पाहिजे यासाठी शासनाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र व गरजू अशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना शासनाकडून कोणीही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी नायगाव विधानसभेचे कार्यसम्राट आ.राजेश पवार यांनी मतदार संघात जास्ती जास्त घरकुलचे ऑनलाईन सर्वेक्षण झाले पाहीजे यासाठी प्रयत्नशिल आहेत. व आ.पवार यांनी ग्रामसेवकांना बक्षीस ही जाहीर केले आहेत.

नायगाव तालुक्यातील ग्रामसेवक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे आदेश पाळून ग्रामसेवक सकाळी आठ वाजताच गावात पोहचत आहेत. कुंटूर येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सूर्यकांत गंगाधरराव कदम व ग्रामपंचायत संगणक चालक प्रल्हाद अडकिने , यांचे सहकारी दशरथ पवार,चंद्रकांत गजभारे,सिद्धार्थ गजभारे, कुंटूर तांडा व कुंटूर मध्ये ही योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे आणि या योजनेचा लाभ पात्र व गरजू लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे हा दूरदृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून गावातील डोर भेट देऊन पात्र व गरजू लाभार्थ्यांचे सर्वे करत असल्याने पात्र व गरजू लाभार्थींना निश्चितच या योजनेचा लाभ मिळेल असा विश्वास गावकऱ्यांना वाटत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!