
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साधनाचा वापर गुणवता वाढी साठी करावा
बाळासाहेब पांडे मांजरमकर
विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या विद्यार्थी दशेत वही आणि पेन चे महत्व लक्षात घेऊन आपली शैक्षणिक गुणवता वाढवावी गावातील प्रतिष्ठित होण्या बरोबर अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगावे या मुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढेल व स्वतः बरोबर गावचे नाव उज्वल होईल असे कर्तृत्व करावे. असे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाकार्यध्यक्ष शंकरराव चव्हाण विद्यालय चे प्रतिनिधी बाळासाहेब पांडे मांजरमकर यांनी कोलंबीच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्रा.शाळा येथे दि.१६ रोजी प्रवेशस्त्व निमित ग्राम पंचायत सरपंच नागरबाई शिंदे, व शिवाजी शिंदे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप समारोह प्रसंगी केले.
या वेळी सरपंच नागर बाई शिवाजी पाटील शिंदे,ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ कोलंबी चे अध्यक्ष उद्धवराव पाटील बैस,उपाध्यक्ष विनायक पाटील शिंदे,सहसचिव बालाजी पाटील बैस,माजी सरपंच शिवदत पाटील पोतलवाड, संगीता बाई सोनमंनकर,ग्रामविकास अधिकारी टी जी रातोलीकर,सरपंच प्रतिनिधी शिवाजी पाटील शिंदे,शालेय समिती अध्यक्ष रतनबाई बरलेवाड ,केंद्रप्रमुख डोमशेर सर,विठ्ठल पाटील शिंदे,प्रवीण बैस,विजय पाटील बैस, अनिल बैस,लक्ष्मीकांत कोतावार,हणमंत कोकुरले, ओंकार पोतलवाड, कैलास बैस,बळीराम बैस,बापूजी शिंदे,जिल्हानी शेख,या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थितीत होते.
कार्यक्रमात प्रास्ताविक,संचलन,आभार प्रभारी केंद्र प्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक डोमशेर सर यांनी केले.कार्यक्रमास आरोग्य तपासणी साठी आलेल्या दुगावकर मॅडम,अंगणवाडी कर्मचारी,जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कर्मचारी यांची उपस्थिती होती.

