
नायगाव
जिल्हा परिषद हायस्कूल मांजरम येथे माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड पूनम ताई राजेश पवार व नायगाव पोलीस स्टेशनचे उप निरीक्षक तोटावाड साहेब यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुनम ताई यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले व या वेळी एक पेड मा के नाम वृक्ष रोपण कराण्यात आले पहिलीतील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना पुनम ताईच्या हस्ते पुस्तकाचे वाटप करण्यात आले.पूनमताई यांनी सर्व शिक्षकांचे शाल हार , पेन भेटवस्तू देण्यात आली
यावेळी गावातील माजी सरपंच सरोजिनी अनंतराव मंगनाळे,माजी चेअरमन गणपतराव गायकवाड,यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक,भाजप पदाधिकारी कार्यकर्ते,शालेय व्यव स्थापन समिती अध्यक्ष,सर्व कर्मचारी नागरिक, पालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांचे आभार तेहरा सर यांनी केले

