ताज्या बातम्यानांदेड

शेकडो भाविक भक्तासह माहूर गडावरील आनंद दत्तधाम आश्रमातून वारीचे प्रस्थान.

श्रीक्षेत्र माहूर :

श्री दत्तनामाचा प्रचार-प्रसार तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आनंद दत्त धाम आश्रमाच्या वतीने माहूरगड येथून गिरनार पर्वताकडे विशेष वारी आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधिपती तथा महाराष्ट्र शासनाचे ब्रँड अँबेसिडर राष्ट्रसंत दभप सदगुरु साईनाथ महाराज वसमतकर यांचे सह शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत मार्गस्थ झाली

दि १५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ९ वाजता माहूरगड आनंद दत्तधाम आश्रम येथील श्री दत्त महाराजांच्या पावन भूमीतून समस्त देवतांचे आशीर्वाद घेऊन ही वारी उत्साहात मार्गस्थ झाली.महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर स्वच्छता दूत आयटीआय चे प्रमुख मार्गदर्शक प.पू. दभप राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांच्या मार्गदर्शनाखाली या महा श्रीदत्त नाम सप्ताह तथा स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, श्री दत्तभक्तांमध्ये श्री दत्तनाम स्मरणाची भावना दृढ व्हावी तसेच स्वच्छतेचा संदेश समाजात पोहोचावा हा या वारीचा मुख्य उद्देश आहे.

महाराष्ट्रातील माहूर येथून सुरू झालेली ही वारी गुजरात राज्यातील पवित्र गिरनार पर्वत जुनागढ येथे पोहोचणार आहे. यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्या सह अनेक ठिकाणी श्री दत्त जप स्वच्छता अभियान तसेच गिरनार येथे श्री दत्त मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून श्री दत्तनामाचा जागर, कीर्तन-प्रवचन तसेच भक्तांना स्वच्छतेबाबत प्रेरणा देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

या प्रसंगी आश्रमाचे कार्यकर्ते, श्री दत्तभक्त तसेच विविध भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले. “मदत का हात, इंसानियत के लिए एक कदम” या संदेशातून अन्न वाया न घालवणे, गरजूंची मदत करणे महिला सशक्तिकरण वृक्ष लावगड आणि स्वच्छतेचे तसेच तसेच दससूत्री चे महत्त्व समाजात पोहोचविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

आनंद दत्त धाम आश्रमाच्या या उपक्रमामुळे श्री दत्तभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून दत्तनामाचा प्रचार-प्रसार आणि स्वच्छतेचा संदेश देशभर पोहोचेल अशी अशा व्यक्त करून श्री दत्तभक्तांनी गिरनार पर्वतावर दत्त नाम सप्ताहात उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रसंत द भ प सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांनी यावेळी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!