
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा येथे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गुलाबाचे फुल देऊन स्वागत …
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे सोमठाणा तालुका नायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा येथील ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी, अधिकारी शालेय शिक्षण समिती व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग यांनी पहिल्या दिवशी मुलांना गुलाब पुष्प देऊन त्यांना पुस्तकांचे वाटप करून शाळेमध्ये प्रवेश घेतला व त्यांना फुल देऊन त्यांचे स्वागत केले . यावेळी ग्रामविकास पदाधिकारीं धनराज केते, सरपंच प्रतिनिधी परमेश्वर पाटील कदम ,उपसरपंच विलास पाटील कदम ,माजी सरपंच अशोक शिंदे ,रोजगार सेवक गौतम कांबळे , शंकर दगडू शिर्से, ग्राम पंचायत कर्मचारी इलाही शेख, शब्बीर शेख, कैलास शिरसे यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व पाठ्यपुस्तक देऊन त्यांचे स्वागत व त्यांच्या सत्कार करण्यात आला. एक महिन्याच्या उन्हाळी सुटल्यानंतर पहिल्यांदा शाळेची घंटा वाजली व शाळेमध्ये सर्व किलबिल आनंददायी वातावरणाला सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी स्वच्छ सुंदर शाळा पहिला दिवस सेल्फी काढून सर्वांना आनंदमय वातावरणात पहिल्या दिवसाची सुरुवात सर्व शिक्षक वृंद यांच्यावतीने करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका सौ. गव्हाणे एस. आर. श्री आलमवाड बी. आर. श्री डोईबळे एस. आर. श्री बुधपा एम. एस. श्री तोटेवाड एन. आर. सौ. अनमोड जी.एस. सौ. आचेवाड आर. एस.
सौ. एकाळे एम. जी. यावेळी गावातील पालक वर्ग ही यावेळी उपस्थित होते पहिल्या दिवशी सोमठाणा येथील शाळेमध्ये आनंदही वातावरणात मुलांना शिक्षण देण्यात आले.त्यावेळी पुष्पगुच्छ पाठ्यपुस्तका देऊन स्वागत करून त्यांना खाऊ देण्यात आला.

