
नायगाव
मराठवाड्याचे भगीरथ स्व.शंकरराव चव्हाण यांची जयंती श्री शंकरराव चव्हाण विद्यालय कोलंबी येथे विद्यार्थ्यांना वैचारिक प्रबोधन व खाऊ वाटप करून साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उद्धवराव पाटील बैस हे होते.तर प्रमुख उपस्थिती मध्ये उपाध्यक्ष विनायक पाटील शिंदे, प्र.मुख्याध्यापक बाळासाहेब पांडे,प्रा. जे. डी.पाटील,प्रा.बी. जी. होटकर ,आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्टगीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तर शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेला मान्यवरच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.सर्व कर्मचारी बांधव यांनी पुष्परचना करीत पुष्पांजली वाहिली.
या वेळी विद्यार्थी बांधव यांना गुलाब पुष्प व खाऊ देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. प्रा.जे. डी. पाटील,एम आर ,सालेगाये, व्ही. पी.जाधव, प्र.मुख्याध्यापक बाळासाहेब पांडे यांनी शंकरराव चव्हाण यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्धव पाटील बैस यांनी चव्हाण साहेबाच्या काळात आलेले संबंध व जुन्या आठवणी सांगून उजाळा दिला. कार्यक्रमाचे संचलन मराठी विषयाचे अध्यापक एम आर सालेगाये यांनी केले तर आभार जाधव सर यांनी मानले.
कार्यक्रमास महानंदा पत्रे मॅडम, अल्का कदम मॅडम,संध्या गजलवाड मॅडम, मंगरुळे मॅडम,प्रा प्रल्हाद येडे सर,वामन शिंदे गुरुजी,गणेश शिंदे सर,भद्रे सर, गुजरवाड सर,कदम, फकीरसाब शेख,तानाजी मारकवाड,यांची उपस्थिती होती.

