
नायगाव : बाळासाहेब पांडे
नायगांव तालुक्यातील बरबडा येथील पत्रकार चंद्रकांत सुर्यतळ यांना ए . डी . फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विविध वृतपत्राचे नायगाव तालुक्यातील बरबडा येथील बातमीदार चंद्रकांत सुर्यतळ यांना जाहीर झाला आहे.
पत्रकार चंद्रकांत सुर्यतळयांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक दिवसा पासून सामजिक प्रश्न सोडवण्यासाठी आणि उपेक्षितांना न्याय देण्याचे काम केले आहे. ग्रामीण भागात परखड पत्रकारिता करत त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न निर्भीडपणे लेखणीच्या माध्यमातून सोडविले आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊनभारतरत्न डॉ.ए . पी . जे . अब्दुल कलाम राष्ट्रिय पत्रकार पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे.पुणे येथे 26 जुलै रोजी ग. दि. माडगुळकर नाट्य गूह पिंपरी चिंचवड येथे सदरील पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे वितरण पुणे येथे होणार आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल मित्र परिवार यांच्यातून त्याचे अभिनंदन होत आहे.

