नायगाव : बाळासाहेब पांडे
नायगाव तालुक्यात पुन्हा एकदा अवैध रेती वाहतुकीचा विळखा वाढताना दिसतो आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे ही वाहतूक बिनधास्त सुरू असतानाच, पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या पथकाने मोठी कारवाई करत २० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई ९ जुलै रोजी रात्री १० वाजता कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहेर बिट येथे करण्यात आली. एम.एच. २४ ए.बी. ६१२५ क्रमांकाचा हायवा अवैधपणे रेती वाहतूक करत असताना पोलीस उपनिरीक्षक ए.पी. शेख यांच्या पथकाने हा हायवा पकडला.
सपोनि विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हायवा पोलीस ठाण्यात लावण्यात आला असून, पोहेका अंगद बाळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी हीवराळे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
कारवाईत हायवा (२० लाख रु.) व पाच ब्रास रेती जप्त करण्यात आली.
🟥 महसूल विभागाची संदिग्ध भूमिका?
तालुक्यातील अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू
महसूल विभाग मात्र ‘मूकदर्शक’, केवळ न दाखवलेली वाहने पकडतो
“हप्ता दिला नाही म्हणूनच गाडी पकडली” असा स्थानिकांचा आरोप
काही अधिकाऱ्यांकडून आर्थिक तडजोडीनंतर महागड्या वाहनांची सुटका?
🟥 : बोटींवर छापे, पण मोठा मुद्देमाल ‘सेफ’?
महसूल विभागाचे बोटीवर छापे दाखवत ‘काम केले’ दाखवण्याचा प्रयत्न
प्रत्यक्षात महागडी वाहने बाजूला ठेवून कमी किमतीच्या हायवा गाड्यांवरच कारवाई आर्थिक समजुतीच्या आधारे कारवाईची दिशा ठरत असल्याचा संशय
🟥 : मुरूम उत्खनन प्रकरण ठंडबस्त्यात?
मांजरम – गोधमगाव शिवारात गेल्या महिन्यात जेसीबी पकडला मंडळ अधिकाऱ्यांनी कारवाई केली, पण आजवर गुन्हा दाखल नाही.
महिन्याभरानंतरही कोणतीच ठोस कार्यवाही न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह
पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेली ही कारवाई कौतुकास्पद असली तरी महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध उत्खनन व वाहतुकीमुळे शासनाला महसूल नुकसान, पर्यावरणाला धोका व स्थानिकांमध्ये अस्वस्थता वाढते आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर व निष्पक्ष भूमिका घेणे अत्यावश्यक झाले आहे.


