नायगाव :- बाळासाहेब पांडे
नायगाव विधानसभा मतदारसंघातील नरसी येथील अवघ्या पाच वर्षांचा तोफिक फिरोज शेख या चिमुरड्याला दुर्मिळ असा कॅन्सरचा आजार झाला होता. उपचारासाठी मोठ्या आर्थिक साहाय्याची गरज असताना, कुटुंबीय आर्थिक अडचणीत होते. अशा कठीण प्रसंगी नायगावचे लोकप्रिय आमदार राजेश संभाजी पवार आणि त्यांच्या पत्नी पूनम राजेश पवार यांनी पुढाकार घेत, त्याच्या उपचारासाठी मुख्यमंत्री विशेष सहाय्यता निधी अंतर्गत आर्थिक मदतीसाठी शिफारस केली.
आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे तोफिकला मुंबईतील टाटा मेमोरिअल हॉस्पिटल येथे उपचारासाठी ₹2,50,000/- (अडीच लाख रुपये) इतकी शासकीय मदत मंजूर झाली आहे. सद्या त्या रकमेवर त्याचे उपचार सुरू असून कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण फुलला आहे.
या मोलाच्या मदतीमुळे तोफिकच्या कुटुंबीयांनी आमदार राजेश पवार व पूनमताई यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. आजारी बालकाला जीवनदान देण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरतो आहे.

