ताज्या बातम्यानांदेडसामाजिक

प्रशांत राठोड यांचे कडून आपादग्रस्तांना कीटचे वाटप.

पाऊस वादळी वाऱ्यामुळे घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना प्रशांत भाऊ यांच्याकडून अन्नधान्य व इतर साहित्याच्या किटचे वाटप.

श्री क्षेत्र माहूर :-  जयकुमार अडकीने

माहूर तालुक्यात तीन दिवसाआधी प्रचंड वादळी वारे आणि पावसामुळे इवळेश्वर महादापूर तांदळा हिंगणी यासह इतर गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अनेक घरावर झाडे पडल्याने कच्च्या घरासह स्लॅब असलेली घरे पडल्याने पाळीव जनावरांचा मृत्यू होऊन अनेकांच्या संसार उघड्यावर आला होता याची माहिती प्रशांत राठोड यांना होताच त्यांनी तहसीलदारांना पाठवून पंचनामे करावयास लावले होते ज्या नागरिकांचे संसार उघड्यावर आले त्यांना प्रशांत भाऊ मित्र मंडळ आणि सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने अन्नधान्य आणि इतर साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आल्याने प्रशांत भाऊ राठोड यांच्या कार्य तत्परतेचे कौतुक होत आहे.           माहूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून हलक्या पावसासह प्रचंड प्रमाणात विजांचा कडकडाट आणि पाऊस पडून बऱ्याच गावात नुकसान झालेले आहे तर नागरिकांनी या तुरळक पडलेल्या पावसात पेरण्या केल्याने आता शेतकऱ्यावर दुबार पेरण्याची पाळी आलेली आहे यातच वादळी वारे आणि पावसामुळे सौर ऊर्जेच्या प्लेटा उडून जाणे कच्च्या घरांचे नुकसान आणि झाडे तुटणे विजेचे खांब पडणे यासह अनेक प्रकारचे नुकसान या वादळी वाऱ्यामुळे होत आहे प्रशासनाकडून पेरण्या करू नका म्हणून आवाहन होत असले तरी खाजगी हवामान तज्ञांनी पेरण्या करून नागरिकांना आवाहन केल्याने नागरिकांनी धूळपेरणी सह पावसाचा अंदाजानुसार पेरण्या केल्या परंतु मिरुगाचा पाऊसच पडला नसल्याने पेरण्या केलेले बियाणे मातीत मिसळल्याने शेतकऱ्यांचे अस्मानी संकटामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे .                                                                     तीन दिवसाआधी वादळी वारे आणि पावसामुळे वरील गावातील नागरिकांचे नुकसान झाल्याने संसार उघड्यावर आले होते याची दखल तात्काळ घेत प्रशांत भाऊ राठोड यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत या नागरिकांचे नुकसान झाले त्यांना प्रशांत भाऊ मित्र मंडळ आणि सेवा संकल्प प्रतिष्ठान च्या वतीने अन्य धान्य आणि इतर साहित्याच्या किटचे वाटप केले यावेळी दिनेश पवार प्रदीप पवार राजू पवार बंडू राठोड अर्जुन जाधव दयाळू जाधव बंडू राठोड सरपंच संतोष जाधव गजानन जाधव गणेश जाधव नूर भाई यांच्यासह इवळेश्वर महादापूर आणि तांदळा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!