ताज्या बातम्यानांदेड

योग शिक्षक नितीन कन्नलवार यांना योगरत्न पुरस्कार!

माहूर- जयकुमार अडकीने

माहुर येथील सुप्रसिद्ध योग शिक्षक नितीन मनोहर कन्नलवार (सह शिक्षक) श्री शंकरराव चव्हाण मा व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टा यांना 22 जुन रविवार रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन,ए.जी.एम.ए व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवाऊगट) डॉक्टर सेल आयुष विभाग यांचे वतीने अतिशय प्रतिष्ठेचा योगरत्न पुरस्कार मोठ्या थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजी नगर येथे देण्यात आला.

या पुरस्काराला महाराष्ट्रातील योग शिक्षक योग थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष शिक्षणमहर्षी डॉ. श्री बाळासाहेब पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून उपस्थित होते.तसेच प्रमुख पाहुण्यांमध्ये उद्योजक मनोज दांडगे साहेब, आयुष इंटरनॅशनल मेडीकल असोसिएशन चे व्हाईस चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.नितीन राजे पाटील डॉ सतीश कराळे चेअरमन आयुष इंटरनॅशनल मेडीकल असोसिएशन दिशा चव्हाण, प्रशांत सावंत, प्रा.कुणाल महाजन,श्री.मनोहर कानडे,व इतर आयुष इंटरनॅशनल असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते.योगाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी सतत कार्यरत असणारे नितीन कन्नलवार यांना हा मानाचा योग रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!