ताज्या बातम्यानांदेड

शिवसेना ठाकरेसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या!.

तालुकाप्रमुख पदी जितू चोले यांची निवड .

माहूर प्रतिनिधी :  जयकुमार अडकीने

माहूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवड झालेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा युवासेना जिल्हाप्रमुख यश खराटे आणि युवा सेना तालुकाप्रमुख अक्षय वाघ यांच्यातर्फे शासकीय विश्रामगृहावर सत्कार करण्यात आला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या असून या निवडीत मतदारसंघातील जुन्या व निष्ठावंत सेना कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला असूनत्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल रुणवाल यांची विधानसभा क्षेत्र प्रमुख तर उपजिल्हाप्रमुख पदी उमेश जाधव,तालुका प्रमुख पदी जितू चोले यांची निवड झाली तालुका संघटक पदी सुशील जाधव,तालुका समन्वयक पदी माजी सभापती नामदेव कातले तर शहर प्रमुख पदी माजी नगरसेवक बालाजी वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे,

जितू चोले कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात त्यांना योग्य पदी नियुक्ती केल्यामुळे त्यांना न्याय मिळाला, असेही या निमित्ताने बोलल्या जात आहे. त्याचबरोबर मागील अनेक वर्षापासून युवासेना उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली

शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय खेळी करण्याचाही त्यांचा प्रयत्न असल्याचेही या निमित्ताने बोलल्या जात आहे.

किनवट तालुकाप्रमुख पदी मारुती दिवसे पाटील शहर प्रमुख पदी प्रशांत कोरडे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी अतुल दर्शनवाढ अभिषेक जयस्वाल,विक्की तामखाने,पवन गवळी, बाळू दवणे शेख वाशीम, कणिक्ष वानखेडे च्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!