ताज्या बातम्यानांदेड

जलयुक्त शिवार अभियान २.० चा माहूर तालुक्यात फज्जा..!

सायफळ येथील कंपोझिट गॅबियन बंधाऱ्याचे काम निकृष्ट..

दोन महिन्या खाली करण्यात आले होते कंपोझिट गॅबियन बंधाऱ्याचे काम..

जयकुमार अडकिने

माहूर तालुक्यातील सायफळ येथे जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत बांधण्यात आलेल्या कंपोझिट गॅबियन बंधाऱ्यांचे काम पूर्णपणे निकृष्ट आणि अंदाजपत्रकाच्या नियमांनुसार नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. संबंधित काम हे ठरलेल्या तांत्रिक निकषांनुसार न करता केवळ कागदावर पूर्ण करण्यापुरते उभारण्यात आले असून, प्रत्यक्ष वापरात ते शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहेत. दोन महिन्या खाली करण्यात आलेल्या कंपोझिट गॅबियन बंधाऱ्याचे पितळ उघडे पडले आहे.

शेतकऱ्यांच्या पायवाटांवरच बंधारे उभारल्याने नाल्याच्या पलीकडील शेतात पोहोचण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नसून केवळ निधी खर्च करण्यापुरतीच मर्यादित राहिल्याचे ग्रामस्थांनी म्हंटले आहे.

⬛ अंदाजपत्रका विरुद्ध काम दर्जा ढासळलेला.

सदर काम हे मंजूर अंदाजपत्रक व बांधकाम मापदंडाच्या पूर्णपणे विरुद्ध असून, वापरलेले साहित्यही अत्यंत सुमार दर्जाचे आहे. काही ठिकाणी बांधकाम पूर्ण झाला आहे. त्यामध्ये टाकण्यात आलेला काँक्रीट बीड पूर्णपणे जमीन धोस्त झाला आहे. अशा हा निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राट दराचे एकही देयक देण्यात येऊ नये जर देव देण्यात आले असेल तर संबंधित ठेकेदारावर शासन निधीचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

 

⬛ कंत्राटदार व अधिकाऱ्यांची साटेलोटेगिरी?

सायकोळ येथे बांधण्यात आलेल्या कंपोझिट गॅबियन बंधाऱ्याच्या कामात दर्जाचा पूर्ण अभाव असून, कंपोझिट गॅबियन बंधाऱ्यांचे लोखंडी जाळीसुद्धा अनेक ठिकाणी उघडे पडले आहेत. त्यामुळे गॅबियन बंधाराच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेल्या दगड वाहून जात असल्याचे चित्र दिसत आहे. संबंधित कामाचे माहिती, माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांतून ठराविक कंत्राटदार निवडून दिले गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी ‘मर्जीतल्या’ कंत्राटदारांना गटात घेत मलई खाण्याचा धंदा सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांतून केला जात आहे.

⬛शेतकऱ्यांची मागणी – चौकशी करा, दोषींवर कारवाई करा!

या बोगस कामामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, कामाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार 2.0 सारखी महत्त्वाची योजना अशा भ्रष्ट कामांमुळे बदनाम होत असल्याची टीका होत आहे…

विशेष म्हणजे सायफळ येथील दोन्ही कंपोझिट गॅबियन बंधाऱ्याची तक्रार देखील कृषी अधिकारी माहूर यांच्या कार्यालयाकडे करण्यात आली आहे मात्र कृषी विभाग झोपेत असल्याचे दिसून येते अद्याप पर्यंत तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे तक्रारदाराने सांगितले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!