ताज्या बातम्यानांदेडनायगावभौगोलिकराजकीय

अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित -आ.प्रतापराव पा.चिखलीकर.

वसंत सुगावे आयोजित गुणवंत विद्यार्थी व शासकीय सेवेत निवड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सन्मान सोहळा संपन्न नायगाव.

विद्यार्थी व युवकांनी अभ्यासात सातत्य ठेवल्यास त्यांना निश्चीतपणाने यश मिळेल या साठी सातत्य पूर्ण अभ्यास व परिश्रम महत्वाचे आहेत असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते *आ.प्रतापराव पा.चिखलीकर* यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्या वतीने आयोजित केलेल्या घुंगराळा येथील गुणवंत विद्यार्थी व शासकीय सेवेत निवड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळा या कार्यक्रमात काढले.

घुंगराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी गुणवंत विद्यार्थी व शासकीय सेवेत निवड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. *गुणवंताचा सत्कार आ.प्रतापराव पा.चिखलीकर यांच्या शुभहस्ते* करण्यात आला. या कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी जि. प. माजी सभापती शिवराज पा.होटाळकर* यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजीराव शिंदे,बिलोली पंचायत समितीचे* *मा. उपसभापती अशोक पा. मुगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसहसचिव प्रा. सुनील नानवटे,महिला व बालकल्याण* *समितीचे सदस्य किशोर नावंदे,कुंटूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले ,नायगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय मिरजकर ,महावितरण चे उपअभियंता शिंदे साहेब,सचिन नाईक,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे,परबत पा.जाधव ,घुंगराळा ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. रुक्मिणीबाई पांचाळ* आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात 10 वी,12 वी ,व इतर स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व शासकीय सेवेत निवड झालेल्या 70 गुणवंताचा आ.चिखलीकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमानंतर छावा संघटनेचे राजेश मोरे देगावकर यांनी आ.चिखलीकर साहेब यांच्याहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश के

धर्माधिकारी यानी बरबडा जि. प.साठी सुगावेचे नाव सुचवल्याने सुगावेची वाट मोकळीआ. चिखलीकर

यावेळी राष्ट्रवादी दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर, यांनी मनोगत व्यक्त करताना वसंत सुगावे यांच्या प्रतिवर्षी होणाऱ्या सामाजिक, धार्मिक ,उपक्रमाची, व विकास कामाची तोंड भरून स्तुती करत अश्या धडपड्या व्यक्तीला गावा पुरते मर्यादित न ठेवता जिल्हा परिषद बरबडा गटाची उमेदवारी देण्याचे जाहीर केल्याने उपस्थितांत टाळ्या चा कडकडाट झाला.एकाच बरबडा गटात धर्माधिकारी व सुगावे हे येत असल्याने आपसात प्रकरण निपटून घेतल्या बद्दल कौतुक करीत चिखलीकरानी सुठे वाचून खोकला गेला अशी प्रतिक्रिया देत वसंतराव चे तोंडभर कौतुक करून दिलीप धर्माधिकाऱ्याच्या औदर्याचे धर्माधिकारी नावाला शोभेल असे कार्य दाखविल्याचे स्पष्ट पणे जाहीर केले.

धर्माधिकारी यानी बरबडा जि. प.साठी सुगावेचे नाव सुचवल्याने सुगावेची वाट मोकळी झाल्याचे आमदार चिखलीकर यांनी जाहीर केले.

अध्यक्षीय समारोप शिवराज पा.होटाळकर यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत सुगावे पाटील यांनी करताना वर्ष भरात होणाऱ्या सामाजिक व धार्मिक उपक्रमाचे स्पष्टीकरण करून गावकरी व गुणवंत विद्यार्थी यांच्या कार्यामुळे आमचे गाव उत्कृष्ट वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट केले.

सूत्रसंचालन प्रा.माधव यमलवाड यांनी तर परबता हणमंते गुरुजी यांनी आभार मानले.या कार्यक्रमास सावरखेड,रुई,निळेगव्हाण, आंतरगाव ,कृष्णर,वंजारवाडी, यासह अनेक गावचे सरपंच,चेअरमन,विद्यार्थी,पालक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!