
माहूर-
वंसतराव नाईक माध्यमीक विद्यालय अनमाळ, ता. माहूर येथील कार्यरत मुख्याध्यापक मा.श्री सारनाथ लोणे दि. 30/06/25 रोजी 32 वर्ष प्रदीर्घ सेवा देऊन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाले असल्यामुळे सेवापुर्ती सोहळा व निरोप समारंभ याचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार राठोड उपाध्यक्ष अजय राठोड, कार्यक्रमाचे अध्यक्ष किसनराव भवरे, प्रमुख पाहुने बळीराम अग्रवाल, माहुरच्या माजी उपनगरअध्यक्षा शोभाताई महामुने, यवतमाळचे API आनंदराव वाठोरे, सरपंच सिद्धार्थ खिल्लारे उपसरपंच जिवन अग्रवाल, संतोष चव्हाण, सुखलाल राठोड, शेषेराव राठोड, शांतीलाल राठोड, संजय कदम, परसराम देव्हारे, राहुल नरवाडे, विकास नरवाडे व प्रतीष्ठीत ग्रामस्त यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पुंडलीक गर्जे व दादाराव खुपसे व सर्व विद्यार्थ्यांनी केले. या वेळी राष्ट्रमाता गुरुकुल विद्यालयाचे मु.अ. ठाकरे सर व कराळे सर व गोविंदराव पाटील विद्यालयाचे चे शिक्षक संजय सर व पंडागळे सर हे उपस्थीत होते.
श्री. सारनाथ लोणे यांनी आनमाळ येथील दुर्गम भागात अभ्यासू व शिस्तप्रिय वातावरण तयार केले त्याबद्दल त्याना आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आले, ते नेहमी मार्गदर्शनास व मदतीस पुढे असायचे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा प्रामानिकपणा व प्रेमळ स्वभाव. त्यांचा असा विश्वास आहे की विद्यार्थांना फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसा नाही तर त्यांना नैतिकतेची शिकवण दिली पाहीजे. त्यांच्या शिकवणीची पावती म्हणजे त्यांचे विद्यार्थी विविध क्षेत्रात राज्यपात्रीत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पर्यावरणप्रेमी म्हणून महाराष्ट्रात नवीन ओळख निर्माण केली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शाळेमध्ये वृक्षारोपन शिबीर व स्वच्छता मोहीम राबवल्या. त्यांना पर्यावरण क्षेत्रात योगदान दिल्या बद्दल त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

