
नायगाव : बाळासाहेब पांडे
शिर्डी प्रतिरूप समजले जाणाऱ्या पानसरे नगरातील श्री साईबाबांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले आहे गुरुपौर्णिमा उत्सव व पालखी सोहळ्या निमित्त आज दिनांक 8 जुलै रोजी मंगळवारी. ते 10 जुलै गुरुवार पहाटे 5.15 वाजता श्री ची काकड आरती 6.00 वाजता.तर 6.15वाजता श्री साईबाबांच्या साई सच्चरित्र ग्रंथाचे पारायण सुरुवात . दुपारी 12.30 वाजता मध्यान आरती. तीर्थप्रसाद. दुपारी 4ते 5 श्रीची ध्यान साधना. सायंकाळी 6.30 धुपारती .रात्री9.00 शेजारती. असे दररोज कार्यक्रम असून.
गुरु पौर्णिमेच्या मुख्य दिवशी पहाटे 5.15 वाजता श्री ची काकड आरती 6.00 वाजता. 7.00 वाजता साई सच्चरित्र ग्रंथाचे पारायण समाप्ती. सकाळी 9.00 वाजता श्री च्या पादुकांचे पूजन व नायगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून पालखीची भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे दुपारी 12.30 वाजता मध्यान आरती सायंकाळी 6.30वाजता धूप आरती. रात्री 9.00 वाजता शेजारती. गुरुपौर्णिमा निमित्ताने जय्यत तयारी सुरू असून मंदिरात विद्युत रोषणाई करून विविध रंगीबेरंगी फुलाने मंदिर सजवण्यात आले आहे. गुरु पौर्णिमा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


