
नायगाव : बाळासाहेब पांडे
गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र दिवस असून, या दिवशी गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरू म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दीपस्तंभ. याच भावनेने कोलंबी (ता. नायगाव) येथील श्री दत्त संस्थान येथे गुरुपौर्णिमा आणि मोक्षपदवासी महंत प्रसादबन गुरु रामेश्वरबन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त १० जुलै २०२५ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी १० वाजता समाधी व ब्रह्मयंत्र यांचा अभिषेक विधी संपन्न होणार आहे. हा अभिषेक गुरुवर्य महंत श्री १०८ यदुबन गुरु गंभीरबन महाराज यांच्या पावन हस्ते होणार असून, यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
या पवित्र दिवशी नांदेड व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन दत्त संस्थान समिती, कोलंबी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

