
इंटरशिपच्या पहिल्या पगारातून समाजसेवा : डॉ. स्नेहल वाघमारे यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी उजळणी साहित्य वाटप
पांगरी तामसा तालुका हदगाव येथील माजी सरपंच श्री सुरेश राघोजी वाघमारे यांची सुकन्या व सध्या वैद्यकीय शिक्षणानंतर इंटरशिप करत असलेल्या डॉ. कु. स्नेहल सुरेश वाघमारे(MBBS) यांनी आपल्या पहिल्याच पगारातून एक समाजोपयोगी उपक्रम राबवून आदर्श घालून दिला आहे.
डॉ. स्नेहल यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या उजळणी पुस्तकांचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
या वेळी शाळेचे सरपंच प्रतिनिधी श्री. नवनाथ शिवाजीराव बदरवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नंदेश्वर सोनबा पाटील भूतनर, मुख्याध्यापक श्री. बालाजी केरबा सोनमनकर, सहशिक्षिका सौ. अर्धापूरकर डी. ए., सौ. मुसांडे जी. आर. व सहशिक्षक श्री. मुसांडे एम. बी. हे मान्यवर उपस्थित होते.
डॉ. स्नेहल यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी भरभरून कौतुक केले असून, तरुण पिढीला सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा हा उपक्रम ठरला आहे.

