Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी शिवराज पाटील होटाळकर यांची नियुक्ती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचे नियुक्तीपत्र आ. चिखलीकरांची घोषणा.

नांयगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत केली.

अजितदादा च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी शिवराज पाटील होटाळकर यांची निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांनी नायगाव,धर्माबाद, उमरी सह नांदेड शहरात आनंदोत्सव साजरा केला.

शिवराज पाटील होटाळकर हे एक मत्सुद्दी राजकारणी म्हणून परिचीत आहेत. त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे सभापती पद उत्कृष्ट पद्धतीने प्रभावी छाप टाकत उपभोगले आहे.

नांदेड दक्षिण जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्कअसून त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. पक्ष नोंदणी कार्यक्रमातही होटाळकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे नांदेडमधील एका सभेत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन प्रशंसा केली. त्यांच्या पक्ष कार्याची नोंद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी शिवराज पाटील होटाळकरांची निवड एका सर्व सामान्य कार्यकर्त्याला मिळालेला न्याय होय अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.पक्षश्रेष्ठींनी त्यांची नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड करून त्यांच्या पक्ष कार्याचे बक्षिस दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 नूतन अध्यक्ष शिवराज पाटील यांची पंचसुत्री :

राष्ट्रवादीची वृध्दी, हीच खरी समृध्दी

१)सर्कल, गण, गांव, शहर तेथे राष्ट्रवादी पक्षाची शाखा व पाटी अनावरन.

२) पक्ष कार्यकर्ता सबलीकरणसाठीलोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ता कार्यशाळा आयोजन.

३) शेतकरी, शेतमजुर, बारा बलुतेदार, महिला व सर्व सामान्य व्यक्ती यांच्यासाठी विधायक कार्यक्रमाची आखणी.

४) ‘दादा ची छाया’ या उपक्रमाअंतर्गत ग्राम पंचायत, गाव, शाळा, दवाखाना तेथे वृक्षारोपण, संरक्षण, संगोपन.

५) राष्ट्रवादी सर्व सेलची सदस्य नोंदणी मोहिम, पदाधिकारी नेते, यांच्या गाडी, घर तेथे पक्ष चिन्ह व झेंडा.

शिवराज पाटील होटाळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल या निवडीचा जल्लोष नायगाव येथील डॉ.हेडगेवार चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी फटाके फोडून जल्लोष उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी दत्ता पाटील यांच्या सह सर्व राष्ट्रवादी पार्टीचे युवक व शिवराज पाटील होटाळकर साहेब मित्र मंडळ नायगाव*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!