ताज्या बातम्यानांदेड

महिलांसंबंधी गुन्हे व तक्रारी निवारण करण्यासाठी महिला दक्षता समीतीने पोलीसांना सहकार्य करावे .

पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचा महिला दक्षता समितीला आवाहन .

महिलांसंबंधी गुन्हे व तक्रारी निवारण करण्यासाठी महिला दक्षता समीतीने पोलीसांना सहकार्य करा

माहूर-जयकुमार अडकिने

महिलांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी महिला दक्षता समितीने पुढाकार घ्यावा. महिला दक्षता समिती मार्फत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असून महिला दक्षता समितीला सर्वतोपरी सहकार्य करू असे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी सांगितले. दि.१८/०७/२०२५ रोजी माहूर पोलीस स्टेशनच्या महिला दक्षता समितीच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक कराड यांनी उपस्थित सदस्यांना महिला व बालकांच्या सुरक्षेविषयक कायद्यातील तरतुदींबाबत माहिती देण्यात आली. तसेच महिला व बालके यांना समाजात कोणकोणत्या अडचणी येतात त्याबाबत काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत अवगत करण्यात आले. महिला व मुली यांना शाळा कॉलेजमध्ये तसेच कामावर येता जाताना व इतर ठिकाणी येणाऱ्या अडचणी तसेच आदिवासी भागातील लहान मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचार संदर्भात पोलीस ठाणे कडून समुपदेशन करण्यात येणार असून त्यामध्ये महिला दक्षता समिती सदस्यांची भूमिका काय आहे त्याबाबत अवगत करण्यात आले पोलीस ठाणे कडील महिला अधिकारी अंमलदार तसेच दामिनी पथक पोलीस दीदी पोलीस काका यांचे बाबत मार्गदर्शन देण्यात आलेले आहेत. यावेळी दक्षता समिती अध्यक्ष सौ.नम्रता कीर्तने, उपाध्यक्ष तथा नगरसेविका सौ.सागर राठोड, सौ.जयश्री अडकीने, शकीलाबी सय्यद, श्रीमती विजया मुळे, हसीनाबी जमीर मलनस, सौ. पद्मा गीऱ्हे, सौ.सुरेखा तळणकर, यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!