ताज्या बातम्यानांदेड

शंकरराव चव्हाण मा व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टा येथे शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार .

माहुर तालुक्यातील श्री शंकरराव चव्हाण मा व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टा येथे दि 1जुलै मा.मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंती पासुन ते 14जुलै स्व.डाॅ.शंकरराव चव्हाण साहेब यांच्या जयंती पर्यंत शाळेत वृक्षारोपण पंधरवाडा साजरा करण्यात येतो. व या पंधरवड्याची सांगता जलक्रांती चे प्रणेते मराठवाडयाचे भाग्यविधाते स्व. शंकररावजी चव्हाण साहेब यांची जयंती ने करण्यात आली त्या निमित्ताने विविध परिक्षा मध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच वृक्षारोपण करण्यात आले .

सदरील कार्यक्रमाला श्री तुकारामजी केशवे शिक्षण संस्था आष्टा चे अध्यक्ष आदरणीय श्री बाबारावजी केशवे साहेब व सचीव आदरणीय अनंतरावजी केशवे साहेब उपस्थित होते . तालुक्यातुन विविध परिक्षांत प्रथम व्दितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचे पर्यवेक्षक एस.डी . सोळंके सरांनी प्रास्ताविक केले .स.शि श्री कोथळकर सरांनी स्व वसंतरावजी नाईक व स्व डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जीवनपटा विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.कार्यक्रमाचे संचलन श्री डोईजोड सरांनी केले तर आभार प्रदर्शन श्री कन्नलवार एन.एम. यांची केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!