ताज्या बातम्यानांदेडपर्यावरण

पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ 9 वे संमेलन 27/28/ ऑक्टोबर माहुर गड येथे होणार आहे ; नांदेड जिल्हाधिकारी यांना मंडळाच्या वतीने निमंत्रण.

माहुर –

नांदेड जिल्हा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे 9 वे पर्यावरण संमेलन 2025 चे आयोजन शक्तिपीठ माहूरगड येथे दिनांक 27 व 28 ऑक्टोबर 2025 संपन्न होणार आहे या संमेलनाचे प्रमुख उद्घाटक म्हणूनजिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निमंत्रित करण्यात आले आहे .यावेळी राहुल कर्डीले यांनी सकारात्मक चर्चा करून पर्यावरणाचे काम अतिशय उत्साहाने आपले सर्व मंडळ करत आहे अशी शाबासकीची थाप दिली आणि मी पर्यावरण संमेलनास उपस्थित राहील अशी ग्वाही दिली त्याबद्दल नांदेडचे जिल्हाधिकारी कर्डिले यांचे पर्यावरण मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले .

यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य अध्यक्ष प्रमोद दादा मोरे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कऱ्हाळे,उपाध्यक्ष प्रकाश केदारी, सचिव डॉ. अनिल लोखंडे, प्रसिद्धीप्रमुख महेश पाडेकर, नांदेड जिल्हाध्यक्ष सारनाथ लोणे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी कपाळे , किनवट तालुका अध्यक्ष बबन वानखेडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!