
कांबळे अनिल
नायगाव तालुक्यातील सातेगाव येथील जीर्णशीर्ण अवस्थेत असलेल्या अंगणवाडी क्रमांक १ चा छत २९ जुलै २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास पावसामुळे कोसळल्याची घटना घडली अत्यंत जुन्या आणि जीर्ण इमारत असल्याने , ज्यात फक्त अंगणवाडीचे साहित्य ठेवण्यात आले होते. बालकांना तात्पुरते अंगणवाडी क्रमांक 1व अंगणवाडी क्रमांक 2 दोन अंगणवाडी एकत्र भरत होत्या शिक्षण घेण्यासाठी आलेल्या बालकास एकत्र बसवले होती, त्यामुळे जीवितहानी टळली, असे सामाजिक कार्यकर्ते आणि अंगणवाडी प्रशासनाने सांगितले.
अंगणवाडी सुपरवायझर स्वामी मॅडम म्हणाल्या की, “ही इमारत अनेक वर्षांपासून जीर्ण झाली आहे. वेळोवेळी आम्ही प्रशासनाकडे याबाबत लेखी तक्रार केली असली, तरी प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद येत नव्हता.” सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील जाधव “मी गेल्या वीस वर्षांपासून या अंगणवाडीच्या इमारतीसाठी निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण सध्याच्या सरकारच्या काळात सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
सातेगाव येथील अंगणवाडीची इमारत १९८३ मध्ये बांधण्यात आली असल्याचे गावकऱ्यांचे म्हणने आहे, ही इमारत खूपच जुनी आणि निकामी झाली आहे. ग्रामपंचायतीने देखील नवीन इमारतीसाठी निधी मंजुरीची मागणी मुख्यमंत्री आणि बालविकास मंत्री यांच्याकडे केली असल्याचे सांगितले आहे.
शासन प्रशासनाने त्वरीत लक्ष देऊन अंगणवाडी बांधकाम निधी देऊन समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे

