ताज्या बातम्याधार्मिकनांदेडनायगाव

श्री शंभो ग्रुप आयोजित १०८ कावड यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; भक्तिभाव, उत्साह आणि सामाजिक सलोख्याचा अद्भुत संगम .

नायगाव

श्रावण महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर श्री शंभो ग्रुप, नायगाव यांच्या वतीने दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य १०८ कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेला नायगाव व परिसरातील शेकडो शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ही पवित्र यात्रा श्री गोदावरी गंगा, बळेगाव येथून गंगाजल भरून प्रारंभ झाली. टाळ–मृदंगाच्या गजरात, “हर हर महादेव” व “बम बम भोले” च्या जयघोषात, संपूर्ण मार्ग भक्तिभावाने गूंजून गेला. अखेरीस, ही यात्रा श्री क्षेत्र गंगनबीड येथे पोहोचून महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून संपन्न झाली.

श्री शंभो महादेवाच्या कृपेने व सदगुरू मन्ना महाराज कोंलबीकर यांच्या आशीर्वादाने यात्रा अत्यंत यशस्वीपणे पार पडली. महिलांचा लक्षणीय सहभाग आणि सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती हे या यात्रेचे विशेष वैशिष्ट्य ठरले.

यात्रेच्या आयोजनात अध्यक्ष श्री. विश्वनाथ मेडेवार, उपाध्यक्ष श्री. अविनाश चालीकवार, माधव पाटील कल्याण, नरेश गंदेवार, साईराम कोटावार, सिद्धेश्वर सुताडे, तसेच मार्गदर्शक श्री. धनंजय कवटिकवार, आशिष मामिडवार, मनोंज डोंगळिकर यांचे विशेष योगदान लाभले.

श्री. राजेश साहेब कुंटूरकर, सुभाष पा. कल्याण, हनमंत नर्तावार यांची उपस्थिती यात्रेला अधिक गौरवशाली ठरली.

ही यात्रा धार्मिक श्रद्धेच्या बरोबरीने सामाजिक सलोखा, शिस्त व सेवाभाव यांचे उदाहरण ठरली. श्री शंभो ग्रुपचे सर्व सदस्य या यात्रेसाठी अहोरात्र परिश्रम घेत होते. त्यांच्या समन्वयातून हे आयोजन एक अविस्मरणीय सोहळा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!