ताज्या बातम्यानांदेड

श्री रेणुकादेवी महाविद्यालयात डॉ.एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त ग्रंथप्रदर्शन करण्यात आला.

श्रीक्षेत्र माहूर

बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीक्षेत्र माहूर येथील ग्रंथालय विभागाच्या वतीने दि. १२ ऑगस्ट रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक , पद्मश्री डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. या निमित्त ग्रंथालयात मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील विविध विषयांवरील आणि स्पर्धा परीक्षा च्या ग्रंथांची ग्रंथप्रदर्शनी लावण्यात आली.या वेळी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य. डॉ आर. एल. लोणे. यांनी डॉ.एस. आर. रंगनाथन यांनी केलेल्या ग्रंथालय व्यवस्थापना बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्याच्या शैक्षणिक कार्याचा उजाळा दिला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड व सचिव सौ. संध्याताई राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. काशीनाथ राठोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन शेख खलील यांनी केले.

कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. विलास पाटील, उपप्राचार्य प्रो. डॉ. राजेंद्र लोणे, उपप्राचार्या डॉ. मेहनाज मुजेवार, संस्था समन्वयक डॉ. तुळशीदास गुरनुले, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!