
जयकुमार अडकिने
माहूर :- स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याच्या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी, नगर पंचायत प्रशासनाने नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या सुयोग्य नियोजनात आज दिनांक १४ रोजी सकाळी ११.३० वाजता माहूर शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली शहरातील मुख्य मार्गांवरून जात देशभक्ती आणि एकतेचा संदेश देत होती.या भव्य दिव्य रॅलीत लोकप्रतिनिधी,अधिकारी,पदाधिकारी,राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव अंतर्गत केंद्र शासनाकडून सन 2022 पासून ‘हर घर तिरंगा’ हि मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार याहीवर्षी ‘हर घर तिरंगा 2025’ मोहीम शासनाकडून (Government) राबविण्यात येत असून, या मोहिमेद्वारे लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविणे, हि मूळ कल्पना असून, याद्वारे शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुशगाने माहूर नगर पंचायतीने तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते.बाईकला तिरंगा लाऊन देश भक्तीचे नारे देत,त्या मागे देशभक्तीपर गीताने असलेला डिजे नागरिकांचे लक्ष वेधून लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करण्याचा व राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.प्रत्येकजण हातात तिरंगा घेऊन आणि घोषणा देत चालत होता. डीजेवर वाजणाऱ्या देशभक्तीपर गाण्यांवर युवक,महिला आणि विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभागी होऊन आपला आनंद आणि उत्साह व्यक्त केला. या रॅलीद्वारे सर्वांना स्वातंत्र्यदिनी आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केले.या देखण्या तिरंगा रॅलीला नगर पंचायत चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी,
तहसीलदार अभिजित जगताप
पोलिस निरीक्षक गणेश कराड, दभप साईनाथ महाराज वसमतकर,माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी,निळकंठ मस्के,
किशोर जगत,उपनगराध्यक्ष नाना लाड,बालाजी वाघमारे,यांनी हिरवी झेंडी दाखविली.या वेळी नगर सेवक विजय कामटकर, नंदा रमेश कांबळे, शेख शकीलाबी, सागर महामुने, श्रीमती आशाताई जाधव, सागर विक्रम राठोड, कविता राजू सौंदलकर, नगरसेवक प्रतिनिधी निसार शेख इरफान सय्यद,सुमित खडसे, लतीफ भाई, आसिफ पठाण,स.कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड, कार्यालय अधीक्षक स्वाती गुव्हाडे, लेखापाल विशाल मरेवाड ,स्थापत्य अभियंता गिरीश दुबेवार ,नगररचना अभियंता रोहित डुकरे, सी एल टी सी विशाल ढोरे ,स.प्रकल्प अधिकारी देविदास जोंधळे,देविदास सिडाम,सी सी मजहर शेख, विजय शिंदे ,गणेश जाधव,सुरेंद्र पांडे,नईम शेख,अशोक तलवारे,जिजाजी ससाणे,सादिक शेख,अविनाश बर्डे, अनिल खडसे, जीवन खडसे,अजय धामणकर, ज्योतीताई,आशाताई, शकीलाबी नगर पंचायत चे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांनी रॅलीमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.

