
नायगाव : बाळासाहेब पांडे
नांदेड जिल्ह्याचे खासदार कै वसंतराव चव्हाण यांच्या प्रथम जयंती आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी नायगांव शहरातील राममंदिर जवळील मारोती कत्तुरवार यांच्या निवासस्थानी करण्यात आली जयंतीची सुरुवात कै खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी नायगांव नगरपंचायतचे नगरअध्यक्ष प्रतिनिधी संजय जी चव्हाण ,सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भालेराव, सामाजिक कार्यकर्ते श्री माणिकराव चव्हाण, ,शरद भालेराव, पवन गादेवार सामाजिक कार्यकर्ते मारोती कत्तुरवार, आदी मान्यवर उपस्थित राहून आदरांजली वाहिली.
अनेकांनी कै खासदार वसंतराव चव्हाण यांच्या जिवन चारित्र्यावर विचार व्यक्त केले व मागिल आठवणी काढत भाऊक झाले त्यांनी केलेल्या कार्याची आठवण आम्ही नायगांवकर कदापि विसरू शकत नाही अशा भावना व्यक्त केल्या, अभिवादन करण्यासाठी कृषी महाविद्यालय हास्टेलच्या विद्यार्थी तर वार्ड क्रं 13 14 15 येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमांचे सूत्रसंचालन नलबलवार सर तर आभार, ज्ञानेश्वर परतवाड यांनी मानले

