
माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्थान, देव देवेश्वर संस्थांच्या संयुक्त मानाचा वैभवशाली पोळा उत्साहात संपन्न झाला., रेणुका देवीचे मानाचे निशान घेऊन अश्वारूढ झालेले शक्तिपूजक मानकरी शुभम भोपी पाटील, रेणुका देवी संस्थानाचा मानाचा बैल घेऊन मानकरी पुजारी राजे दुर्गादास भोपी जाधव पाटील सहकारी विनायकराव फांदाडे आधी सह भोपी, भट बहुसंख्येने उपस्थित होते रेणुका देवी संस्थान चा मानाचा बैल व मानाचे निशाण येऊन अश्वारूढ झालेले मानकरी यांची वाजत गाजत माहूर शहराच्या दक्षिण दिशेकडील जागमाता येथून मिरवणूक निघाली माहूर शहरातील कपिलेश्वर शंभू महादेवाची महाआरती करून पुढे रवाना झालेली मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली तर देव देवेश्वर संस्थान कडून संस्थानाचा मानाचा बैल व मानाचे निशाण घेऊन अश्वारूढ मानकरी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच श्री रेणुका देवी संस्थान चा मानाचा बैल व देवेश्वर संस्थानाचा मानाचा बैल एकमेकांसमोर येताच पोळा फुटतो त्याप्रमाणे पोळा फुटला माहूर शहरातील रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाची सजावट करून पोळ्या मध्ये सामील केले होते, यावेळी चंद्रकांत भोपी, एडवोकेट उज्वल भोपी, एडवोकेट समीर भोपी, श्रीपाद जहागीरदार, संजय काण्णव, भवानीदास भोपी संभाजीराव भोपी, गजानन भोपी, अनिल काण्णव, अरविंद देव, अमित भोपी, वल्लभ आमले, वल्लभ महाजन, किशोर संतान, विशाल काण्णव, मंगेश रिठे गणेश जगत, विजय शास्त्री कोरटकर आदीसह अनेक भट, भोपी व शेकडोच्या संख्येने भाविक पोळा मिरवणुकीत सहभागी झाले होते. पोळा झडतीच्या गणात काही शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा उपहास करून बळीराजाच्या राज्य शासनाकडे पोहोचविण्याचा प्रयत्न केला. ते म्हणजे देवा भाऊ म्हणे शेतकऱ्यांचा सातबारा, करूया म्हणे हो कोरा कोरा कोरा, वोट घेतले हो भराभरा भरा, अजितदादा म्हणे राज्याचा कोश नाही बरा, लाडक्या बहिणी पायी रिकामा झाला गल्ला कर्जमाफीसाठी शेतकरी करून राहिले कल्ला, एकनाथ भाऊ म्हणे अजित दादा देवा भाऊलेच विचारा, एक नमन गौरा पार्वती पत्ते संभाच्या नावाने हर बोला हर हर महादेव हे या पोळ्याचे वैशिष्ट्य ठरले.

